प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकशाही संग्राम सैनिकांसाठी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय जुलै 2022 मध्ये घेतला होता ही योजना लागू झाली असून आता ऑगस्ट 2020 ते जुलै 2022 अशी थकबाकी देखील या सैनिकांना मिळणार आहे यासाठी शिंदे फडणवीस सरकारने 61.22 कोटी रुपयांची तरतूद केली असून याचा लाभ 3339 लोकशाही संग्राम सैनिकांना मिळणार आहे. Emergency Pension Scheme implemented in Maharashtra; Two years of arrears will also be available!!
ही पेन्शन योजना ठाकरे – पवार सरकारने 2020 मध्ये कोरोनाचे कारण देऊन बंद केली होती. ठाकरे – पवार सरकारमध्ये काँग्रेस सामील होती आणि काँग्रेसचीच राजवट 1975 मध्ये केंद्रात असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. त्यावेळी लाखो लोकशाही संग्राम सैनिकांनी त्यावेळच्या सरकारशी संघर्ष केला होता. त्या सर्वांना तुरुंगवास झाला होता.
देशातल्या विविध राज्यांमध्ये आधीच या सैनिकांसाठी पेन्शन योजना लागू केली आहे. 2018 मध्ये फडणवीस सरकारने ही योजना लागू केली होती. फडणवीस सरकार सत्तेवर असेपर्यंत ही योजना चालू राहिली. त्यानंतर ठाकरे – पवार सरकार आल्यानंतर 2020 मध्ये ही योजना त्या सरकारने बंद केली होती. मात्र, शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर लोकशाही संग्राम सैनिकांसाठी पेन्शन योजना पुन्हा लागू केली आहे, इतकेच नव्हे तर दोन वर्षांची थकबाकी देखील त्यांना मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App