प्रतिनिधी
मुंबई : Electricity गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. एक एप्रिलपासून घरगुती, औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेचे दर ७ ते १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. वीज नियामक आयोगाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. महावितरणचा दरवाढीचा प्रस्ताव आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे एका घराचे लाइट बिल सरासरी १०० ते १५० रुपयांनी कमी होऊ शकते.Electricity
सौरऊर्जेस आडकाठी नाही
घराघरावर उत्पादित होत असलेल्या सौरऊर्जेच्या बाबतीत टीओडीचा (मीटर रीडिंगचे युनिट) नवा स्लॅप महावितरणने प्रस्तावित केला होता, मात्र तोदेखील वीज नियामक आयोगाने नाकारला आहे. यामुळे घराच्या छतावर आता निर्धोकपणे सौरऊर्जेचे उत्पादन करता येईल. महावितरण यात घालू पाहत असलेली एक मोठी आडकाठी आयोगामुळे दूर झाली असून सौरऊर्जा ग्राहकांना यामुळे दिलासा मिळाला.
एका फ्लॅटच्या बिलामध्ये अशी होऊ शकते घट
एखाद्याचा २ बीएचके फ्लॅट असेल तर महिन्याला साधारणत: १०० ते ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर झाल्यास त्याला सध्या ८०० ते १२०० रुपयांपर्यंत बिल येते. परंतु, आता त्यात सात ते दहा टक्क्यांनी कपात होणार आहे. त्यामुळे संबंधित फ्लॅटचे वीज बिल घटून ते ७२० ते ११०० पर्यंत येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App