प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाक्याच्या देवीच्या दरबारात दिला. आज अश्विन शुद्ध अष्टमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे देवीची महापूजा आणि आरती केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. Eknath Shinde’s speech on giving reservation in the court of Devi of Tembi Naka
मराठा समाजातील आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहेत. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मी कधीही कुणाला खोटे आश्वासन दिले नाही. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकले. पण, सर्वोच्च न्यायालयात ते रद्द झाले. ते का रद्द झाले याबद्दल मी सध्या बोलणार नाही पण आम्ही सर्वोच्च न्यायालयात दुरूस्ती याचिका ( क्युरेटिव्ह पिटीशन ) दाखल केली आहे. मराठवाड्यात कुणबी दाखला मिळण्यासाठी ‘जस्टिस शिंदे’ समिती गठीत केली आहे. त्यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे.
मराठा समाजातील बंधूंनी टोकाचे पाऊल उचलू नये. सरकारला थोडा वेळ देण्याची गरज आहे. मुलांचा आणि कुटुंबाचा विचार प्रत्येकाने करावा. मराठा आरक्षणासाठी प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत. आरक्षण मिळेपर्यंत जास्तीत जास्त लाभ मराठा समाजाला कसे मिळतील, यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहोत, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
मी कधीही कुणाला खोटं आश्वासन दिलेलं नाही. कुणाची फसवणूक केली नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App