विशेष प्रतिनिधी
मुंबई : Praveen Darekar विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याचा दावा भाजपने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ते त्यांच्यासोबत जातील अशी कोणतीही शक्यता नाही. आमदार संजय शिरसाट यांनी यासंबंधी मांडलेली भूमिका त्यांच्या पक्षाची नाही, असे भाजपने म्हटले आहे.Praveen Darekar
विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाला आहे. आता राज्यात कुणाची सत्ता येणार? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत. यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ माजली असताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिरसाट यांचा दावा धुडकावून लावला आहे.
संजय शिरसाट यांची भूमिका शिवसेनेची अधिकृत नाही
प्रवीण दरेकर म्हणाले की, संजय शिरसाट यांची भूमिका ही काही त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे असे मला वाटत नाही. त्यांच्या पक्षाची ही अधिकृत भूमिका असती तर मी त्यावर भाष्य केले असते. तथापि, मला असे काही घडेल असे अजिबात वाटत नाही.
एकनाथ शिंदे यांनी शरद पवार व महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणुका लढवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही लढवल्या आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या विचारातून महायुती किंवा भाजपसोबत युती केली, ते पाहता अशा प्रकारची तिळमात्रही गोष्ट होऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
आता पाहू काय म्हणाले होते संजय शिरसाट?
उल्लेखनीय बाब म्हणजे संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य केले होते. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले होते की, शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतली. आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही. पण शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जात असतात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही त्यांचा शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही त्याला बांधिल आहोत. ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबुतीने राहू, असे ते म्हणाले होते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App