विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath shinde केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येण्यापूर्वीच शिवसेनेचाच दबाव कामी आला सत्तेबाहेर राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा इरादा आपल्याच नेत्यांच्या दबावामुळे बारगळला. शपथविधीच्या भगव्या आणि गुलाबी पत्रिकांचा घोळ बराच रंगला गुलाबी पत्रिकेवर एकनाथ शिंदेंचे नाव नव्हते त्यामुळे माध्यमांनी संशय वाढवला. Eknath shinde
या सगळ्यांमध्ये वर्षा आणि सागर बंगल्यावर आज दुपारपर्यंत सातत्याने खल झाला. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत सत्तेबाहेर राहता कामा नयेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, यासाठी भाजप आणि त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांनी मोठा दबाव आणला. गिरीश महाजन, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय शिरसाट वगैरे नेते त्यासाठी कामाला लागले होते. वर्षा बंगल्यावरचे वरचे निरोप सागर बंगल्यावर आणि सागर बंगल्यावरचे निरोप वर्षा बंगल्यावर पोचवले जात होते.
Devendra Fadnavis : द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात देवेंद्रपर्व, फडणवीसांनाच मुख्यमंत्रिपद का मिळाले? 10 ठळक मुद्दे
एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर अमित शाह यांच्या फोनची वाट पाहत असल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरली. परंतु, एकनाथ शिंदे यांना भेटायला शिवसेनेचे शिष्टमंडळ गेले. तुम्ही उपमुख्यमंत्री होणार नसाल, तर शिवसेनेचे आम्ही कुणीही मंत्री होणार नाही, असे या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांना सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या हातात आमचे राजकीय भवितव्य आहे, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.
या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांचाच दबाव कामी आला. आपल्या विशिष्ट आग्रहामुळे इतर शिवसैनिकांचे राजकीय करिअर धोक्यात येऊ नये, याची एकनाथ शिंदे यांना काळजी घ्यावी लागली. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचे पत्र राजभवनावर पोहोचवण्याचा निर्णय झाला. हे सगळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल होण्यापूर्वी घडले याला विशेष महत्त्व आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App