प्रतिनिधी
मुंबई : सुप्रीम कोर्टात हरल्यानंतर “ते” फटाके फोडत आहेत. पण आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य ठरवून टाकले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला आहे. Eknath shinde targets Uddhav Thackeray over Supreme Court verdict
सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षावर निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी सह्याद्री अतिथिगृहावर एकत्रित पत्रकार परिषद घेतली. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे गटावर निशाणा साधला.
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते, असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले. न्यायालयाच्या या निरीक्षणावरून आता शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत राहणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
https://youtu.be/JkZApQx_nL4
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
खरं म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. या देशात संविधान आहे, कायदा आहे, नियम आहे, असे सगळेच आहे. त्याचा बाहेर कोणालाही जाता येणार नाही. हे माझे शब्द नेहमी आपल्याला आठवत असतील. आणि आम्ही जे सरकार स्थापन केलं, ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसवून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून सरकार स्थापन केले. आणि बहुमताचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे अनेक लोकं घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार म्हणत स्वतःचीच पाठ थोपटवून घेत होते. परंतु आज त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. तसंच घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App