भाजप मध्ये पराभवाचे मंथन, सत्तेच्या वळचणीला बसून राष्ट्रवादीचे भाजपवर खापर; पण शिवसेनेची प्रत्यक्षात कारवाई!!

Eknath shinde shivsena expelled beed district shivsena chief for anti party activities

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप महायुतीचा परफॉर्मन्स का कमी पडला??, यावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंथन आणि एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना प्रत्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षाच्या नेत्याला कारवाईची धडक देऊन दाखवली आहे. Eknath shinde shivsena expelled beed district shivsena chief for anti party activities

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या अपेक्षित पराभवानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची हाकालपट्टी केली आहे. कुंडलिक खांडे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची शहानिशा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट कारवाई करून महायुतीतील आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. भाजपचे अनपेक्षित अपयशाचे पराभव मंथनच सुरू आहे, तर राष्ट्रवादीचे नेते परफॉर्मन्स दाखवू शकले नाहीत तरी त्यांचे भाजपवर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. अमोल मिटकरी रोज कुठले ना कुठले खुसपट काढून भाजपवर तोंडसुख घेत आहेत.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे या ऑडीओ क्लीपमध्ये कुंडलिक खांडे म्हणाले. त्यामुळे महायुतीत मोठं वादळ निर्माण झाले.

कार्यलयाची झाली होती तोडफोड

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि कुंडलिक खांडे यांच्या दरम्यान झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील असल्याचे म्हटले जात होते.  या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले होते. या संदर्भात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक  झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने  दगडफेक करुन तोडले होते.

Eknath shinde shivsena expelled beed district shivsena chief for anti party activities

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात