विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath shinde महायुतीच्या जागा वाटपात शिंदे ठरले लाभार्थी; आकड्यांमधून साधली पवारांशी बरोबरी!!, असे आज समोर आले.Eknath shinde
महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या कमळ चिन्हावर 148, उरलेले 4 मित्र पक्ष असे मिळून 152, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 85, तर अजितदादांची राष्ट्रवादी 51 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद आणि आता लढवायला 85 जागा असा मोठा लाभ एकनाथ शिंदेंना यानिमित्ताने झाला आहे. एकनाथ शिंदे महायुतीत येताना 40 आमदार बरोबर घेऊन आले होते, पण त्यांना लढवायला मिळालेल्या जागा मात्र दुपटीच्या वर 5 आहेत. एकनाथ शिंदेंना त्यांच्या राजकीय धाडसाचे पुरेपूर बक्षीस भाजपने दिले.
अजितदादा त्या तुलनेत कमी लाभार्थी ठरले. अजितदादा देखील बरोबर 40 – 42 आमदार घेऊन आले. त्यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद आणि लढवायला 51 जागाच येऊ शकल्या.
पण या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या आकडेवारीशी बरोबरी केली. महाविकास आघाडीचे जागा वाटप करताना शरद पवारांनी 85 चा खोडा टाकून पाहिला. त्यात ठाकरे आणि काँग्रेसला अडकवायचा प्रयत्न केला, पण काँग्रेस त्यात अडकली नाही. काँग्रेसने 101 उमेदवारी जाहीर केले. पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला मात्र 87 जागा आल्या. काँग्रेस आणि ठाकरे यांनी त्यांच्यावर कुरघोडी केली.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी मध्यंतरी शरद पवार 85 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे आपण त्यांना राष्ट्रवादीचे 85 आमदार निवडून आणून भेट देऊ, अशी गर्जना केली होती, पण प्रत्यक्षात पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला लढवायलाच फक्त 87 जागा आल्या. पवारांच्या 60 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा हा कळसाध्याय झाला. 60 वर्षांच्या कारकिर्दीत पवारांना पक्षाची वाढ क्रमांक एकचा पक्ष म्हणून करता आली नाही. काँग्रेस आणि ठाकरेंची अखंड किंवा फुटलेली शिवसेना देखील त्यांना वरचढच ठरली.
त्या उलट एकनाथ शिंदे यांनी कारकिर्दीच्या मध्यावरच पवारांशी आकडेवारीतून बरोबरी साधली. एकनाथ शिंदेंचे कारकीर्द पवारांच्या तुलनेत कितीतरी लहान आहे, तरी देखील महायुतीमध्ये त्यांनी भाजप बरोबर समन्वय राखून बरीच मोठी मजल मारली. जागा वाटपाच्या आकडेवारीने हे सिद्ध केले. आता प्रत्यक्ष निवडणुकीत शिंदे आणि पवार हे आपापल्या पक्षांचे किती आमदार निवडून आणू शकतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App