महाराष्ट्रातील सत्ता डोक्यात गेली; हिंदुहृदयसम्राट लिहून राजस्थानात पोस्टरवर आली!!

महाराष्ट्रातली सत्ता डोक्यात गेली; “हिंदूहृदयसम्राट” लिहून राजस्थानात पोस्टरवर आली!!, असे म्हणायची वेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणली आहे. Eknath shinde must not use the word hinduhridaysamrat for himself as it is not justifiable for his own political capacity

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानात जयपूर मध्ये एकाच मतदारसंघात प्रचाराला गेले. तिथे त्यांनी रोड शो केला. त्या रोड शो मधल्या प्रचाराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख “हिंदूहृदयसम्राट” असा करण्यात आलेला आढळला. त्यावरून महाराष्ट्रात ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट असा वाद पुन्हा पेटला.

हिंदूहृदयसम्राट या शब्दावरून ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांचा जोरदार समाचार घेतला. देशात हिंदुहृदयसम्राट दोनच. पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नंतर बाळासाहेब ठाकरे, असा उल्लेख संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद आणि त्यातली बकवास हे विषय कितीही राजकीय चेष्टेचे असले, तरी त्यांनी हिंदूहृदयसम्राट या विषयावर शिंदे गटाला ऐकवलेले बोल खरेच आहेत.

कारण एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा होणे किंवा असा करणे हे कितपत योग्य आणि वास्तवाला धरून आहे?? हा मूलभूत प्रश्नच आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन अवघे दीड वर्ष झाले आहे. त्याआधी ते महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नेते होते. भाजपने स्वतःच्या स्ट्रॅटेजीनुसार ठरवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. त्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व महाराष्ट्रात वाढले, पण ते एवढेही वाढलेले नाही की त्यांचा उल्लेख लगेच हिंदूहृदयसम्राट असा करावा!! पण हे शिंदे गटाला समजलेले नाही हेच त्या पोस्टरवरच्या उल्लेखावरून दिसते.

महाराष्ट्रात असे पोस्टरवरचे “भावी मुख्यमंत्री” राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पडले आहेत. दर वाढदिवसाला राष्ट्रवादीचे नेते पोस्टरवर “भावी मुख्यमंत्री” म्हणून चढवले जातात आणि काही दिवसांत उतरवले जातात. पोस्टरवर लिहून कोणी मुख्यमंत्री होत नाही, याची जाणीव पोस्टरवर “भावी मुख्यमंत्री” लिहिलेलेच नेते करून देत असतात, पण कार्यकर्ते ऐकत नाहीत त्यांच्या मनातल्या भावना ते पोस्टरवर लिहीतच राहतात. पण त्यामुळे “भावी मुख्यमंत्री” हे शब्द आता राजकीय खिल्ली उडविण्याचे झाले आहेत. तसा “हिंदूहृदयसम्राट” हा शब्द बिलकुलच चेष्टेचा विषय नाही. त्यासाठी प्रचंड खपावे लागते. मेहनत घ्यावी लागते. आयुष्य झोकून द्यावे लागते. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले म्हणून त्यांना समस्त भारतीयांच्या वतीने आर्य समाजाने दिल्लीत एका भव्य दिव्य कार्यक्रमात पहिल्यांदा हिंदूहृदयसम्राट हे बिरुद बहाल केले, तरीही सावरकर स्वतःला हिंदू संघटकच म्हणवून घेत असत, हे अधोरेखित केले पाहिजे.



सावरकरानंतर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायला लागले. बाळासाहेबांनी हिंदुत्व या विषयावर तडजोड करून कोणाशी पुढून किंवा मागून संधान बांधले नाही. उलट हिंदुत्व या मुद्द्यावर निवडणूक लढविण्याची हिंमत दाखविली. मतदानाचा हक्क गमावला तरी त्यापासून माघार घेतली नाही. ज्यावेळी संपूर्ण देशात हिंदुत्व हा शब्द राजकीय दृष्ट्या त्याज्य होता, त्यावेळी म्हणजे 1986 मध्ये त्यांनी हिंदुत्व हा शब्द राजकीय दृष्ट्या चलनात पुन्हा आणला. त्यांनी आयुष्यभर हिंदुत्व या विषयावरच निवडणुका लढवल्या हरल्या आणि जिंकल्या.

एकनाथ शिंदे यांचे तसे नाही. ते मूळात सावरकर किंवा बाळासाहेबांच्या सारखे पहिल्या फळीतले नेतेच नाहीत. ते एक उत्तम कार्यकर्ते – नेते आहेत. बाळासाहेबांचे कट्टर अनुयायी आहेत. भाजपने स्वतःच्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले आहे. राजकीय कर्तृत्व हाच निकष लावायचा म्हटला तर एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे हे दुसऱ्या – तिसऱ्या फळीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला हिंदूहृदयसम्राट असे बिरुद लावून घेणे मूळातच उचित नाही आणि ते पोस्टरवर लिहून घेणे तर बिलकुलच योग्य नाही. कारण त्याची त्या बिरुदाची “भावी मुख्यमंत्री” या पोस्टर सारखी राजकीय चेष्टा होते. ती होऊ न देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची आहे.

स्वतः एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात तशी सत्तेची हवा गेली नसेल, पण त्यांच्या आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यात गेली असेल आणि त्यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट अशी लिहून पोस्टरवर आणली असेल, तर ती डोक्यातली हवा काढण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांची आहे. ती त्यांनी पार पाडली पाहिजे!!

Eknath shinde must not use the word hinduhridaysamrat for himself as it is not justifiable for his own political capacity

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात