प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगलेली दिसते आहे. Eknath shinde gives befitting reply to Uddhav Thackeray
विधानसभेत बहुमत चाचणी जिंकल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा विजय झाला. त्यानंतर अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमोकळं भाषण करत सगळ्यांची मनं जिंकली. शिंदेंच्या या भाषणाची चर्चा होत असतानाच माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला. रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट होती, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटवर प्रत्युत्तर दिले.
विधानसभेत बोलताना रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट पळत होती, तिला ब्रेकच लागत नव्हता, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनातील महिला मेळाव्यात केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे’, असे ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
– फडणवीसांचाही प्रतिटोला
काँग्रेस पक्षाने देखील पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवलं. पण मोदींनी काँग्रेसला असं पाणी पाजलं त्यामुळे काँग्रेसची अवस्था आज काय आहे, हे आपण बघतोय. आणि जर आम्ही रिक्षावाले, पान टपरीवाले, चहा टपरीवाले, रस्त्यावरचे विक्रेते असलो तरी त्याचा आम्हाला अभिमान आहे. या देशात स्वाभिमानाने जो जगतो तोच खरा राजा असतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App