प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाला अखेर सोमवारी पूर्णविराम मिळाला. शिवसेना – भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून आपल्या सत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात अभिनंदनपर भाषण केले. या भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. Eknath Shinde asked Fadnavis in the House
काय झाले नेमके?
बहुमत चाचणी जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले असून एकनाथ शिंदे हे या सरकारचे मुख्यमंत्री असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘नमस्कार करू का?’, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यानंतर फडणवीसांनी परवानगी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उभे राहिले आणि हात जोडत त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. एकनाथ शिंदे यांच्या या कृतीमुळे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली.
शिंदे-भाजप सरकारचा विजय
शिंदे-भाजप आघाडीने 164 मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाल्यामुळे शिंदे-भाजप सरकार बहुमत चाचणीत देखील यशस्वी होईल, हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे सोमवारी झालेल्या बहुमताच्या चाचणीत देखील शिंदे -भाजप सरकारने विजय संपादन केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App