प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेत आपल्या कारकिर्दीच्या सगळ्या कहाण्या सांगताना एका कहाणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते खूप भावनाशील झाले. एकनाथ शिंदे यांचा दोन मुलांचा अल्पवयात मृत्यू झाला. त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांचे फक्त सांत्वन केले नाही, तर त्यांना खूप मोलाचा धीर दिला. ही आठवण सांगताना एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय जीवनाचा संपूर्ण आढावा या भाषणात घेतला. Eknath shinde became emotional while remembering his deceased children
#थेटप्रसारण महाराष्ट्र विधिमंडळ #विशेषअधिवेशन जुलै – २०२२#Vidhansabha https://t.co/9KGG6FhUeo — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 4, 2022
#थेटप्रसारण
महाराष्ट्र विधिमंडळ #विशेषअधिवेशन जुलै – २०२२#Vidhansabha https://t.co/9KGG6FhUeo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 4, 2022
– एकनाथ शिंदे म्हणाले :
श्रीकांत डॉक्टर झाला, मी रात्री यायचो तो बाहेर जायचा. मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला वेळ दिला, शिवसैनिकांना वेळ दिला. माझ्या आयुष्यात दुखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या समोर गेली. त्यावेळेस मला आधार दिला, आनंद दिघे साहेबांनी आधार दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App