प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती अद्याप चर्चेच्याच पातळीवर असताना त्यांच्यावर राजकीय कुरघोडी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आपली युती प्रत्यक्ष अस्तित्वात आणली आहे. Eknath Shinde and jogendra kawade Strike alliance in maharashtra, before Uddhav Thackeray and prakash Ambedkar come together
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांची युती झाल्याची घोषणा बुधवार, 4 जानेवारी 2023 रोजी दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती होणार अशी चर्चा गेले काही महिने राजकीय वर्तुळाच आहे. दोन्ही पक्षांनी आपापले प्रतिनिधी चर्चेसाठी अनेकदा बसविले देखील आहेत. परंतु, या युतीमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी यांचा खोडा असल्याची उघड टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे आंबेडकर यांची युती नुसतीच चर्चेच्या पातळीवर राहून ती अद्याप प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे आणि कवाडे यांनी मात्र आपल्या चर्चेच्या फेऱ्या लवकर संपवून बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची युती प्रत्यक्षात अस्तित्वात आणली आहे.
काय म्हणाले प्रा. कवाडे?
आधीपासून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत जाण्याचा विचार करत होतो. खूप धाडसी निर्णय शिंदे यांनी घेतला. धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. राज्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आश्वस्त करणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहेत. काही जण बाप लीडर असतात एकनाथ शिंदे हे तळागळातून आले आहेत. त्यांच्यावर प्रभावित होऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाने शिंदे गटासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला, असे प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाच्या आघाडीची घोषणा करत आहोत. शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार यांचे विचार आमच्या आघाडीची धारणा असणार आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली, तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या गावाला जाऊन आले आणि तिथे पुण्यातील भिडे वाड्याचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आमच्या आघाडीची राज्यात सभा होणार आहेत, अशी घोषणा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
जेव्हा सरकार बदलले तेव्हापासून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे सरकार सर्व सामान्यांचे सरकार दिसते, असे सांगत राहिले. कवाडे यांचा पक्ष आणि आमचा पक्ष संघर्षातून पुढे आला आहे. प्रा. कवाडे आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आंदोलनाने त्यांनी प्रस्थापितांना हादरवून टाकले होते. त्यांना ६ महिने तुरुंगात ठेवले होते, २० जिल्ह्यांमध्ये भाषण बंदी केली होती. शोषित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी ओबीसींच्या प्रश्नावर दिल्लीतही आंदोलन केले, त्यावेळी तिहार जेलमध्येही त्यांना ठेवले होते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App