हडपसर पोलिसांनी वाहन चालक सामीउल्लाह मुर्जता हुसेन (वय 51) याला ताब्यात घेतले आहेEicher container full of gutkha, gutka worth Rs 46 lakh and valuables worth Rs 70 lakh seized on Solapur highway
विशेष प्रतिनिधी
पुणे : हडपसर पोलिसांनी काल (ता. ८) मध्यरात्री सोलापूर महामार्गावर गुटख्याने भरलेला एक आयशर कंटेनर पकडला आहे.दरम्यान या कारवाईत पोलिसांनी 46 लाखांचा गुटखा आणि 20 लाखांचा टेम्पो असा 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच हडपसर पोलिसांनी वाहन चालक सामीउल्लाह मुर्जता हुसेन (वय 51) याला ताब्यात घेतले आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर विजापूर आणि निपाणी येथून आला असून, तो फुरसुंगी परिसरातील एका गोडावूनकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान हडपसर पोलिसांनी सापळा रचून गुटख्याने भरलेला हा कंटेनर ताब्यात घेतला.या कंटेनरमध्ये 350 पोत्यामध्ये तब्बल 46 लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App