विशेष प्रतिनिधी
नांदेड : काही त्या तपास यंत्रणाचा अधिकारी नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ईडीची पुढील कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत.ED’s next action against Ashok Chavan, Chandrakant Patil’s signal
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोट निवडणूक होत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात देखील आयकर विभागाने धाड टाकली. ईडी किंवा आयकर विभागाची आता पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का? असा प्रश्न भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी अप्रत्यक्षपणे तसे संकेत दिले.
कालच नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला हे आपोआप समोर येईल, असे म्हणत माजी मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला होता.
विखे पाटील म्हणाले, होते की महाविकास आघाडीच्या मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. राज्यातील काही प्रकरणे उघड झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री अडकलेला असल्याचं लवकरच समोर येईल. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App