शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ, ईडीचं समन्स, आधी निकटवर्तीयाला झाली अटक

ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali, directed to Appear on 4th October Before ED

ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे. कालच खासदार गवळी यांचा निकटवर्तीय सईद खानला ईडीने अटक केली होती. आता ईडीने भावना गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रस्टमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali, directed to Appear on 4th October Before ED


प्रतिनिधी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना खासदार भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे. कालच खासदार गवळी यांचा निकटवर्तीय सईद खानला ईडीने अटक केली होती. आता ईडीने भावना गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रस्टमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.

खा. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनमार्फत बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डने 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरीश सारडा यांनी दावा केला की, भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं मात्र ती कंपनी कधीच सुरू केली नाही.

भावना अ‌ॅग्रो प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस या कंपनीत अनियमिततेचेही आरोप आहेत. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून 7.5 कोटींचं कर्ज घेण्यात आलं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला 7.9 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशांच्या हेराफेरीप्रकरणी भावना गवळी यांचा निकटवर्तीय असलेल्या सईद खानला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. ईडी कोर्टात हजर केलं असता 1 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिवसेनेचे पाच नेत्यांमागे ईडीचा ससेमीरा

शिवसेनेचे पाच दिग्गज नेत्यांगे ईडीचा ससेमीरा लागला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर 100 कोटी वसुलीप्रकरणी चौकशी सुरू आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील 900 कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरणात, यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी या ट्रस्टमधील गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या निशाण्यावर आल्या आहेत. सेना आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी झाली होती.

ED summons to Shiv Sena MP Bhavana Gawali, directed to Appear on 4th October Before ED

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात