रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो वर 6 ठिकाणी ED चे छापे; अबुधाबीतून रोहित पवारांचे “स्वाभिमानाचे” ट्विट!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : देशातल्या प्रत्येक विषयांवर “तज्ञ प्रतिक्रिया” व्यक्त करणाऱ्या आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या 6 ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने छापे घातले आहेत. रोहित पवार सध्या भारतात नाहीत. ते अबुधाबीत आहेत. तिथून त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर महापुरुषांचे फोटो टाकून “स्वाभिमान” शेअर केला आहे!! रोहित पवार हे नवीन आमदार आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असे परवाच म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी ED छाप्यांसाठी पवारांच्या घरातल्या घरभेद्यांना जबाबदार धरले आहे. ED raids Rohit Pawar’s Baramati Agro at 6 locations

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ED ईडीने सकाळीच छापे घातले. एक दोन नव्हे तर बारामती अ‍ॅग्रोच्या 6 ठिकाणांवर ही छापेमारी केली. आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेवर आहेत. असे असतानाही ED ने थेट पवार घराण्यातच हात घातल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले. या छापेमारीवर रोहित पवार यांनी अबुधाबीतून प्रतिक्रिया व्यक्त केली.

या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात

हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.


प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!


सात तासांपासून झाडाझडती

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोवर या कंपन्यांच्या सहा ठिकाणच्या कार्यालयावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 8.00 वाजता ही छापेमारी करण्यात आली. 9 तास झाले तरी अजूनही ED चे अधिकारी कंपनीत झाडाझडती घेत होते. पुणे, बारामती, पिंपळी आणि संभाजीनगरसहीत सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कागदपत्र तपासणे सुरू

रोहित पवार हे बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचं बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. बँकेचा तपशीलही तपासला जात असून संगणकातील फोल्डरही पाहिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तक्रारी आल्यावर छापेमारी होत असते

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या छापेमारीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या काही तक्रारी असतात त्यानुसार छापेमारी होत असते. कुणाचीही तक्रार आली की त्यावर तपास होतो. महाविकास आघाडीच्या काळात आमच्याही चौकश्या झाल्या. चौकश्या होत असल्याने घाबरून जायचं नसतं. ज्यांच्यावर छापे पडले त्यांनी योग्य कागदपत्रे दिली आणि मांडणी केली तर पुढे काही होत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आपलेच घरभेदी यात सामील

या छापेमारीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचं हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाहीत, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

ED raids Rohit Pawar’s Baramati Agro at 6 locations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात