विशेष प्रतिनिधी
नागपूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या ‘ट्रायव्होलेट’ या हॉटेलवर सक्त वसुली संचालनालयाने धाड टाकली. शुक्रवारी ईडीने देशमुखांच्या फेटरी येथील नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात झाडाझडती घेतली होती.ED raids on hotels of Anil Deskmukh
देशमुख व त्यांचे कुटुंबीय या संस्थेचे संचालक आहेत. हवालामार्फत याच संस्थेला चार कोटी रुपये वळते केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सध्या चार कोटींच्या हवालाप्रकरणी देशमुखांच्या दोन स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना ताब्यात घेतले आहे.
मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तीन ठिकाणांवर पुन्हा ईडीची छापेमारी, नागपुरात सकाळपासून शोधमोहीम
ईडीने आत्तापर्यंत तीन वेळ देशमुख यांना उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावला आहे. मात्र ते अद्याप ‘ईडी’च्या कार्यालयात गेले नाही. वकिलांमार्फत त्यांचा युक्तिवाद सुरू आहे. तसेच ‘ईडी’च्या कारवाईला त्यांनी सर्वोच्च न्यालयात आव्हान दिले आहे.चौकशीला सहकार्य करूनही ईडी वारंवार त्रास देत असल्याची भूमिका देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. तेथे त्यांना दिलासा मिळणार का, याची आता उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App