प्रतिनिधी
मुंबई – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे घालून केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात काही नवीन नसल्याचे म्हटले आहे. नैराश्यातून कारवाई केलीय. त्यात काहीही सापडलेले नाही, असाही दावा केला आहे. ED raids anil deshmukh residence, sharad pawar – narayan rane reacts opposite
या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी करावे तसे भरावे अशा शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख कारवाई झालेले काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने असा वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती.
पण त्यातून त्यांना काय हाती लागले हे मला माहिती नाही. पण माझ्या मते काहीही हाती लागलेले नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची आम्ही चिंता करण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अशाच आशयाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या प्रतिक्रियांवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, की जे केले आहे त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता यात कोणी राजकारण आणू नये. राष्ट्रवादी काँग्रेसने तर करूच नये. आता हे सिद्ध होऊ द्या आणि बाहेर येऊ द्या, काय आहे ते मग बघू. मराठीत एक म्हण आहे, करावे तसे भरावे. सध्या त्यांचे तसे सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App