अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कारवाई केली. पाटणकर यांच्या कंपनीच्या नीलांबरी प्रकल्पाशी संबंधित 11 फ्लॅट ईडीने सील केले. या सदनिकांची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख आहे. या कारवाईला 24 तासही उलटले नाहीत, तोच आणखी एक बातमी पाटणकरांबाबत समोर येत आहे.ED In Action ED ready to give another blow to CM’s sister-in-law, find out which file will open now
वृत्तसंस्था
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कारवाई केली. पाटणकर यांच्या कंपनीच्या नीलांबरी प्रकल्पाशी संबंधित 11 फ्लॅट ईडीने सील केले. या सदनिकांची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख आहे. या कारवाईला 24 तासही उलटले नाहीत, तोच आणखी एक बातमी पाटणकरांबाबत समोर येत आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी भागातील श्रीधर पाटणकर यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या रडारवर आहे. पाटणकर यांनी पाचपाखाडी भागातील एका पुनर्वसन प्रकल्पात गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. ही तपासणी करण्यासाठी बुधवारी ईडीचे काही अधिकारी येथे आल्याचे वृत्त आहे.
आधीच्या कारवाईला 24 तासही उलटले नसताना ईडीकडून नव्या कारवाईची तयारी सुरू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत डिनर डिप्लोमसी सुरू केली आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईतील वर्षा बंगल्यात त्यांनी खासदार आणि आमदारांना डिनरचे निमंत्रण दिले. सरकारची कामे जनतेसमोर घेऊन जा आणि भाजपच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, असे सर्वांना सांगण्यात आले.
ईडीचे अधिकारी पाचपाखाडीला पोहोचले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या नीलांबरी प्रकल्पातील फ्लॅटवर मंगळवारी ईडीने कारवाई केली. आता ठाण्यातील पाचपाखाडी येथील पुनर्वसन प्रकल्पात श्रीधर पाटणकर यांची हिस्सेदारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाटणकर किंवा त्यांची कंपनी श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावावर काही मालमत्ता असल्याचीही माहिती येथे मिळत आहे. या माहितीमुळे पाटणकर पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आले आहेत. सध्या ईडी या व्यवहाराची चौकशी करत आहे. मात्र अद्याप ईडीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
पाचपाखाडीच्या पुनर्वसन प्रकल्पात पाटणकर यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत पैसे गुंतवले आहेत, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. या माहितीच्या आधारे ईडी आपली चौकशी करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App