माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रीग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रीग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरमहा १०० कोटीची वसुली टार्गेट प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला होता.ED files money laundering case against former Home Minister Anil Deshmukh
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी र देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नव्हता.
मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता अमलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केल्याने देशमुख या प्रकरणात पुरते फसल्याचे मानण्यात येत आहे.
सीबीआयने अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते . देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले होते. कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितल होते.
कोर्टाने सीबीआयला 100 कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे.
त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App