विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सध्या फेक न्यूज अर्थातच धादांत खोट्या बातम्या चालवण्याचे मोठे षडयंत्र कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. आधी अनिल देशमुख यांची संपत्ती सोडवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली होती. पण ती फेक न्यूज ठरली. मराठी माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता अनिल देशमुख यांची संपत्ती सोडविण्याचे आदेश ईडीला दिल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. Earlier, Anil Deshmukh’s assets were released
आता त्यापुढे जाऊन राज्यपालांवर फेक न्यूजची संक्रांत आली असून राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्तीची शिफारस स्वीकारल्याची ही बातमी आली आहे. मात्र संबंधित बातमी आणि त्याबरोबर जोडलेले पत्र फेक असल्याचा निर्वाण प्रत्यक्ष राजभवनाने दिला आहे.
विधान परिषदेवर 12 आमदारांची नियुक्ती हा विषय वादग्रस्त ठरला आहे. ठाकरे – पवार सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष यातून उभा राहिला आहे. मध्यंतरी या मुद्द्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसांत आज राज्यपालांनी ठाकरे – पवार सरकारची 12 आमदार नियुक्त करण्याची शिफारस मान्य केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसले. त्यात आमदारांची नावे देखील होती. परंतु, राजभवनातून या संदर्भात महत्त्वाचा खुलासा करण्यात येऊन राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या नावाने फिरलेले पत्र फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्थातच या फेक न्यूज महाविकास आघाडी सरकारच्या बाजूच्या कशा असतात??, अनिल देशमुख यांची संपत्ती “कोण” “सोडवते”??, राज्यपालांच्या नावाने खोटे पत्र सोशल मीडियावर कोण व्हायरल करते?? हे प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App