प्रतिनिधी
मुंबई : बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतका अन्याय छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कोणी केला नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरद पवारांवर महाराष्ट्रात सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. एका बाजूने त्यांचे समर्थक विरोधकांवर तुटून पडत आहेत, तर पवारांचे विरोधक पवारांची जुनी भाषणे काढून त्यांच्यावर शरसंधान साधत आहेत. Due to this duplicitous attitude, Pawar is infamous
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांचे 1974 सालचे पत्र शेअर करून पवारांच्या दुटप्पी मनोवृत्तीवर झगझगीत प्रकाश टाकला आहे. हे पत्र सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फिरत आहे. बाबासाहेबांनी उभी केलेली शिवसृष्टी पाहून शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यांच्या हस्ताक्षरातले आणि त्यांच्या स्वाक्षरीचे संबंधित पत्र आहे. या पत्रामध्ये शरद पवारांनी बाबासाहेब यांच्या शिवछत्रपती चरित्र लेखनात आणि शिवसृष्टी उभारण्यात केलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत. pic.twitter.com/abObhA8qUq — Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) July 24, 2022
पवार साहेबांचं राजकारण किती खालच्या पातळीचं असू शकतं याचा धडधडीत पुरावा. १६ मे १९७४ रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचं कौतुक करणाऱ्या शरद पवारांना आज त्यांचं लिखाण चुकीचं वाटू लागलं आहे. ह्याच वृत्तीमुळे पवार साहेब बदनाम आहेत. pic.twitter.com/abObhA8qUq
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) July 24, 2022
मात्र याच शरद पवारांनी श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्राच्या प्रकाशन समारंभात बाबासाहेबांनी शिवचरित्रावर अन्याय केला, असे उद्गार काढले होते. शरद पवारांचे जुने पत्र आणि कालचे वक्तव्य या दुटप्पी व्यवहारावर निलेश राणे यांनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. किंबहुना अशाच दुटप्पी वर्तणुकीने शरद पवार बदनाम झाले, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App