विशेष प्रतिनिधी
पुणे : बायकोच्या प्रियकराचे अपहरण करून त्याचा खून केला, तसेच मृतदेह दारूच्या भट्टीमध्ये जाळून टाकला. दृश्यम चित्रपटाप्रमाणे मृतदेहाऐवजी शेळीला कापून तिचे अवशेष गोणीत भरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बावधन येथे घडली आहे.Drushyam l style attempts to hide murder, Body of wife’s lover burnt in liquor kiln
लंकेश सदाशिव रजपूत ऊर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरुण कैलास रजपूत (दोघेही रा. बावधन) आणि सचिन तानाजी रजपूत (वय २५, रा. कासारआंबोली, ता. मुळशी),अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तसेच एका अल्पवयीन मुलासही पोलिसांनी ताब्यात घेतले. भूषण शंकर चोरगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांनी माहितीनुसार बायकोसोबत मयत भूषणचे अनैतिक संबंध असल्याचा संशय लंकेशला होता. २१ आॅक्टोबरला भूषण हा लंकेशच्या बायकोला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी लंकेश व त्याच्या दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने मारहाण करून भूषणचा खून केला. उरवडे गावात असलेल्या त्याच्या दारूच्या भट्टीमध्ये मृतदेह जाळला.
त्याची राख व इतर अवशेष घोटावडे परिसरातील नदी व नाल्यात टाकून दिले. खुनात सहभागी नसलेला सहकारी सचिन रजपूत याला मयत भूषण चोरगे यांच्या शरीराचे अवशेष एका पोत्यात भरून उरवडे येथील नाल्यात टाकले असल्याचे सांगितले.
भूषण बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या आईने दिली. हिंजवडी पोलिसांना संशयित आरोपी सचिन याच्याकडे चौकशी केली. मुख्य आरोपी लंकेश रजपूत आणि अरुण रजपूत हे मध्य प्रदेशात गेल्याचे त्याने सांगितले, तसेच मृतदेह पोत्यात टाकलेली जागाही दाखविली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पोती ताब्यात घेतली.
मात्र, तपासात त्या पोत्यात शेळीचे अवशेष मिळाले. दृश्यम चित्रपटाप्रमाणे आरोपींनी कट रचल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली देत घटनाक्रम सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App