विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : अमली पदार्थ विरोधी विभागाने कोल्हापूर मधील फार्महाऊस मधून 2.35 करोड रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. हे फार्महाऊस एका वकिलांचे आहे. राजकुमार राजहंस असे या वकिलाचे नाव आहे. दर कॉन्ट्राबँड आणि एमडी अशा मादक पदार्थांचे ते स्वतः उत्पादन करायचे. दर आठवड्याला कोल्हापूरला जाऊन ते उत्पादन करायचे आणि मुंबईत येऊन व्यापाऱ्यांना विकायचे. संशय येण्यापासून दूर राहण्यास आणि त्यांनी आपली परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ता अशी इमेज तयार केली होती. दर आठवड्याला ते सुमारे 8 ते 10 किलो एमडी कोल्हापूर मधून मुंबईमध्ये पोहोचवत असत. अशी माहिती सूत्रांकडून कळाली आहे. आणि या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे.
Drugs worth Rs 2.35 crore were seized from Kolhapur by the Anti-Narcotics Department
पोलिसांनी 35 वर्षीय ड्रग्ज पेडलर क्रिस्टिना मॅग्लिन, आलीस आयेशा, आलीस सिमरन यांना साकीनाका येथून अटक केली होती. यांच्याकडून 5 लाख रुपयांचे एमडी 13 नोव्हेंबर रोजी जप्त करण्यात आले होते. या चौकशी अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला आणि 2.35 कोटी रुपयांचे एमडी बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
Mumbai Cruise Drug Case : नुपूर सतिजाकडून बेकायदेशीररीत्या ड्रग्ज जप्त केले होते, शोध घेणारी महिला NCB अधिकारी नव्हती
राजहंस यांच्या फार्महाऊसवरील केअरटेकर निखिल लोहार यांने पोलिसांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, राजहंस यांनी स्थानिक लोकांना सांगितले होते की लवकरच इथे तीन शाळा उघडण्यात येतील आणि प्रत्येकाला नोकरी देण्यात येईल. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांनी 5000 ते 10000 रुपये अॅडव्हान्समध्ये दिलेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App