मुलांच्या डायपरमधून लपवून आणले ड्रग्स , ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या तयारीत होती एअऱ होस्टेस ; पोलिसांनी केलं अटक

चौकशीदरम्यान मानसीने मुंबई आणि इंदूरमधील अनेक तस्कऱ्यांची नावं सांगितली. मानसी ही देह व्यापार आणिमानवी तस्करीतील आरोपी सागर जैन उर्फ सँडोच्या टोळीशी संबंधित आहे.Drugs hidden in children’s diapers, air hostess preparing for December 31 party; Police made the arrest


विशेष प्रतिनिधी

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर क्राइम ब्रान्चने मुंबईतील एका तरुणीला १०० ग्रॅम एमडीएमए (ड्रग्स) सह अटक केली आहे. ही तरुणी ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी तस्करांना मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आली होती. तरुणी मुलांच्या डायपरमधून ड्रग्स लपवून आणत होती.पोलीस या संशयितांवर लक्ष ठेवून होती.दरम्यान पोलिसांनी चार दिवसांपूर्वी नार्को हेल्पलाइन नंबर ७०४९१०८३८३जारी केलं होतं.

पोलिसांना यानंबरवरुन सूचना मिळाली होती.दोन दिवसांपूर्वी क्राइम ब्रान्चच्या टीमने ग्राहक बनून तस्करांशी संपर्क केला आणि तरुणी मुंबईहून इंदूरला येत असताना तिला अटक केली.पोलिसांनी सांगितलं की, तरुणीजवळ नेपाळ आणि बहरीनचे चलन मिळाले आहेत.



कोण आहे ही मानसी ?

तरुणीने आपलं नाव मानसी असल्याचं सांगितलं आहे. तिने सांगितलं की, ती एअऱ होस्टेस होती.ती सुरुवातील आंतरराष्ट्रीय हवाई सेवेत काम करीत होती. मात्र काही वर्षांनी तिने हे काम सोडून दिलं.ती डार्क नेटशी जोडलेली होती.

चौकशीदरम्यान मानसीने मुंबई आणि इंदूरमधील अनेक तस्कऱ्यांची नावं सांगितली. मानसी ही देह व्यापार आणिमानवी तस्करीतील आरोपी सागर जैन उर्फ सँडोच्या टोळीशी संबंधित आहे. ती हाय प्रोफाइल पार्टीमध्ये ड्रग सप्लाय करते. तिने अन्य तस्कऱ्यांची नावांचाही खुलासा केला आहे.

Drugs hidden in children’s diapers, air hostess preparing for December 31 party; Police made the arrest

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात