Dr Swapna Patkars serious allegations against Sanjay Raut : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांकडून दाद मिळत नाही म्हटल्यावर आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. ‘ऑप इंडिया’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर होत्या. त्यांनीच शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. Dr Swapna Patkars serious allegations against Sanjay Raut, wrote letter to PM Modi
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसांकडून दाद मिळत नाही म्हटल्यावर आता थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. ‘ऑप इंडिया’ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर होत्या. त्यांनीच शिवसेना खासदार संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
डॉ. स्वप्ना पाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय मिळवून देण्याची विनवणी केली आहे. त्यांनी स्वत:ला सुशिक्षित महिला असल्याचे सांगत पत्रात लिहिले की, त्यांना सहानुभूती नको, तर न्याय पाहिजे. स्वप्ना पाटकर यांनी आरोप केलाय की, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे सह-संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून त्यांना शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत.
पत्रात पुढे त्यांनी लिहिले आहे की, त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत अनेक प्रकरणांत चौकशीसाठी बोलावले जाते. त्यांनी लिहिले की, ‘शिवसेना भवन’च्या तिसऱ्या मजल्यावर बोलावून त्यांच्या नातेवाइकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना माझ्याशी संबंध तोडण्यासाठी मजबूर करण्यात आले. सोबतच हे सर्व संपवण्यासाठी 4 कोटी रुपयांच्या मागणीचा आरोपही त्यांनी केला आहे.
I reached out to @MumbaiPolice @pmo @cmo @AmitShah @PawarSpeaks @NCWIndia & every politician of every party on #sanjayraut harassment issue. Nobody helped me. I won’t die like #SSR I won’t give up.I will fight.Join my fight.This hashtag is my identity #myrightmyfight Please RT. pic.twitter.com/IZCJi9Ol6p — I AM SWAPNA (@drswapnapatker) April 5, 2021
I reached out to @MumbaiPolice @pmo @cmo @AmitShah @PawarSpeaks @NCWIndia & every politician of every party on #sanjayraut harassment issue. Nobody helped me. I won’t die like #SSR I won’t give up.I will fight.Join my fight.This hashtag is my identity #myrightmyfight Please RT. pic.twitter.com/IZCJi9Ol6p
— I AM SWAPNA (@drswapnapatker) April 5, 2021
डॉ. स्वप्ना पाटकर आपल्या पत्रात लिहितात… “पोलीस चौकशी करायला लावूनसुद्धा जेव्हा संजय राऊत यांचे समाधान होत नाही, तेव्हा मला त्रास देऊन, छळ आणि बदनामी करून माझे चारित्र्यहनन केले जात आहे. ते म्हणतात की, पोलिसांकडे गेलीस तरीही काहीही होणार नाही. 2013 मध्ये माझ्यावर 2 वेळा हल्ला झाला. तपास अजूनही सुरू आहे. कोणीही आरोपी मिळाला नहाी. 2014 मध्ये ACP प्रफुल्ल भोसले यांनी विनाकारण माझ्याविरुद्ध चौकशी सुरू केली. माझ्यावर संजय राऊत यांना खंडणी मागण्याचा आरोप केला. 2015 मध्ये माझा पाठलाग सुरू करण्यात आला. धमक्या मिळाल्या. मी कुणाशी बोलावे, कुणाशी नाही, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला. मी कुठे जातेय, काय करतेय- या सर्वांवर संजय राऊत यांचे लक्ष होते. मला रोज ईमेल पाठवून सांगावे लागायचे की, मी कुठे गेले होते, कुणाशी भेटले. ऐकले नाही तर एक नवी पोलीस केस तयार व्हायची.”
“पोलीस चौकशी करायला लावूनसुद्धा जेव्हा संजय राऊत यांचे समाधान होत नाही, तेव्हा मला त्रास देऊन, छळ आणि बदनामी करून माझे चारित्र्यहनन केले जात आहे. ते म्हणतात की, पोलिसांकडे गेलीस तरीही काहीही होणार नाही. 2013 मध्ये माझ्यावर 2 वेळा हल्ला झाला. तपास अजूनही सुरू आहे. कोणीही आरोपी मिळाला नहाी. 2014 मध्ये ACP प्रफुल्ल भोसले यांनी विनाकारण माझ्याविरुद्ध चौकशी सुरू केली. माझ्यावर संजय राऊत यांना खंडणी मागण्याचा आरोप केला. 2015 मध्ये माझा पाठलाग सुरू करण्यात आला. धमक्या मिळाल्या. मी कुणाशी बोलावे, कुणाशी नाही, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला. मी कुठे जातेय, काय करतेय- या सर्वांवर संजय राऊत यांचे लक्ष होते. मला रोज ईमेल पाठवून सांगावे लागायचे की, मी कुठे गेले होते, कुणाशी भेटले. ऐकले नाही तर एक नवी पोलीस केस तयार व्हायची.”
Email sent @manjunathsinge @CPMumbaiPolice @MahaDGIPR @CMOMaharashtra @maha_governor @sharmarekha 1 lesson learnt is @MumbaiPolice is not the solution if the criminal is a politician. Maharashtra is unsafe @TV9Marathi @abpmajhatv @mataonline @LoksattaLive @smritiirani @NCWIndia pic.twitter.com/nErFtsqLYH — I AM SWAPNA (@drswapnapatker) January 14, 2021
Email sent @manjunathsinge @CPMumbaiPolice @MahaDGIPR @CMOMaharashtra @maha_governor @sharmarekha 1 lesson learnt is @MumbaiPolice is not the solution if the criminal is a politician. Maharashtra is unsafe @TV9Marathi @abpmajhatv @mataonline @LoksattaLive @smritiirani @NCWIndia pic.twitter.com/nErFtsqLYH
— I AM SWAPNA (@drswapnapatker) January 14, 2021
आता स्वप्ना यांनी आरोप केला आहे की, खा. संजय राऊत यांच्या इशाऱ्याने पोलिसांनी त्यांच्यावर ‘धंदा’ केल्याचा आरोपही केला होता. त्यांनी आरोप केलाय की, 2017 मध्ये स्वत: संजय राऊत यांनी फोनवर धमकी दिली आणि 2018 मध्ये भाडोत्री माणसाला त्यांचा पाठलाग करायला लावला. स्वप्ना सांगतात की, त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सना हॅक करून कधी सुसाइड नोट, तर कधी अश्लील कंटेंट टाकण्यात आला, परंतु पोलिसांनी स्पष्ट म्हटले की, संजय राऊत यांच्याविरुद्ध ते FIR नोंदवू शकत नाहीत.
त्यांचा आरोप आहे की, त्यांच्या सहकाऱ्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून अटक करण्यात आली आणि त्यांचे चरित्र प्रमाणपत्र बनवण्यात आले. त्यांनी म्हटले की, त्या राष्ट्रीय महिला आयोगाकडेही लेखी तक्रार घेऊन गेल्या होत्या, परंतु पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोगाचाही अनादर केला. पत्रात त्यांनी संजय राउत यांच्यासाठी ‘दरिंदा’ शब्द वापरत लिहिलेय की, त्यांना अजूनही अश्लील व्हिडिओ कॉल केला जातो आणि शिव्या दिल्या जातात.
स्वप्ना पाटकर म्हणाल्या की, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांच्या कृत्यांबाबत सांगितले, परंतु काहीही फायदा झाला नाही. त्यांनी मनसुख हिरेन आणि पूजा चव्हाण यांच्या संशयित मृत्यूंचा उल्लेख करत म्हटले की, जर त्यांचा मृत्यू झाला, तर ती आत्महत्या नसेल.
डॉ. स्वप्ना पाटकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून अनेक स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल पाठवल्यानतर आलेले अॅक्नॉलेजमेंट दिसू शकते. यासोबतच त्यांनी एका चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करून दावा केलाय की, संजय राऊतच त्यांना मैसेज पाठवतात. त्यांनी मुंबईच्या झोन 8 चे DCP यांना ईमेलही पाठवला होता. त्या म्हणाल्या की, ट्विटरवर संजय राऊत यांनी त्यांना ब्लॉक करून ठेवलेले आहे.
डॉ. स्वप्ना पाटकर या मनोविकारतज्ज्ञ आहेत. यासोबतच त्या द रॉयल मराठी एंटरटेन्मेंट नावाच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरही आहेत. 2013 मध्ये त्यांनी ‘जीवन फंडा’ या नावाचे प्रेरणादायी पुस्तकही लिहिलेले आहे. माइंड वर्क्स ट्रेनिंग सिस्टिम या नावाने त्या समुपदेशनाचे क्लिनिकही चालवतात. डॉ. स्वप्ना पाटकर मुंबईत ‘सॅफरन 12’ नावाचे एक मल्टी कुझिन फॅमिली रेस्तरांही चालवतात. मार्च 2013 मध्ये झालेल्या रेस्तरांच्या उद्घाटनात अभिनेता संजय दत्त, संगीतकार बप्पी लाहिरी, गायक सुरेश वाडेकर यांच्याशिवाय दिलीप ताहिल आणि मुरली शर्मा यांच्यासारखे ज्येष्ठ चरित्र अभिनेतेही पोहोचले होते. सर्वात मोठी बाब म्हणजे, ‘सामना’मध्ये त्या ‘कॉर्पोरेट मंत्र’ आणि ‘आठवड्याचा माणूस’ या नावाने कॉलम लिहायच्या.
Dr Swapna Patkars serious allegations against Sanjay Raut, wrote letter to PM Modi
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App