डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मुश्रीफांवर उधळली स्तुतीसुमने ; म्हणाले …..

मुश्रीफांना शेकडो विधवा महिलांचे आशिर्वाद मिळाले असून, त्यांनी आरोग्याचे केलेले काम हे इतर लोकप्रतिनिधींना दिशादर्शक ठरणारे आहे.Dr. Shripal Sabnis showered praises on Mushrifs; Said …..


विशेष प्रतिनिधी

हरळी : हरळी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सबनीस यांनी मुश्रीफांवर स्तुतीसुमने उधळली.यावेळी डॉ. सबनीस म्हणाले की , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फार किरकिर सहन केली. एकही रुपयाचा भ्रष्टाचार केला नसल्यानेच आज सिंबॉयसिस सारख्या संस्थेत डॉ. शा.बं. मुजुमदार यांच्या समवेत अगदी ताठ मानेने ते बसू शकले.



डॉ.सबनीस हे आपल्या परखड विधानामुळे चर्चेत असतात. सोमवारी त्यांनी मुश्रीफांची केलेली स्तुती चर्चेची ठरली.याच कार्यक्रमात सबनीस यांनी, मुश्रीफांना शेकडो विधवा महिलांचे आशिर्वाद मिळाले असून, त्यांनी आरोग्याचे केलेले काम हे इतर लोकप्रतिनिधींना दिशादर्शक ठरणारे आहे.

पुढे सबनीस म्हणाले की , कडवा राष्ट्रवाद शिकविणाऱ्यांना मुश्रीफांनी आपण कुणाचे शिष्य आहोत, हे दाखवून दिले आहे, तसेच शरद पवार यांचा मुश्रीफांवर किती विश्वास आहे हे सर्व घटनांमधून दिसून येत असल्याचेही वक्तव्य सबनीस यांनी केले.

Dr. Shripal Sabnis showered praises on Mushrifs; Said …..

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात