डॉ बाबासाहेब आंबेडकर देशात जन्मास आले हे आपले भाग्य आहे, त्यांची दूरदृष्टी, कृर्तत्व, उपयाेगितता देशाच्या उभारणीत महत्वपूर्ण असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. Dr. Babasaheb Ambedkar is multitalent personality says ex agriculture minister Sharad Pawar
विशेष प्रतिनिधी
पुणे : देशाचे अर्थकारण, विकास याकरिता आधुनिक शेती संकल्पनाबाबत अनेक निर्णय डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले. मजूर कामगार मंत्री असल्याने त्यांनी त्याकाळात अनेक कामगार कायदे सखाेल विचार करुन तयार केले. ‘रुपी’बाबत त्यांनी प्रबंधाचे लिखाण केले त्यामुळे त्यांना डाॅक्टरेट मिळाली. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात देश व लाेकांसाठी अनेक गाेष्टी केल्या त्याची माहिती त्यांच्या संग्रहालयाच्या माध्यमातून पुढील पिढीला उपयाेगी ठरु शकते. बाबासाहेब देशात जन्मास आले हे आपले भाग्य आहे, त्यांची दूरदृष्टी, कृर्तत्व, उपयाेगितता देशाच्या उभारणीत महत्वपूर्ण असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
सिंबायाेसिस संस्थेच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या राैप्य महाेत्सव कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापाैर सुनीता वाडेकर, सिंबायाेसीसचे संस्थापक डाॅ:शां.बा.मुजुमदार, डाॅ.विद्या येरवडेकर, संजीवनी मुजुमदार उपस्थित हाेते.
पवार म्हणाले, सिंबायाेसिस मध्ये शैक्षणिक गुणवत्ता जपण्याचे काम करण्यात येत असून त्यामुळे सदर शिक्षण संस्था देशभरासह जागतिक पातळीवर नावाजली आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ठेवाची उत्तम मांडणी संग्रहालयात करण्यात आली आहे. आंबेडकर केवळ घटनेचे शिल्पकार हाेते इतकेच ते मर्यादित नाही. संविधानाची मांडणी कशाप्रकारे चांगली केली पाहिजे याबाबत सखाेल अभ्यास त्यांनी केला त्यामुळे संविधान आजही किती मजबूत आहे हे दिसून येते. देशाची लाेकशाही टिकवण्यासाठी संविधान कितपत महत्वपूर्ण आहे ही बाब आपल्या बाजूचे श्रीलंका, पाकिस्तान देशाची परिस्थिती पहिल्यावर लक्षात येते. संसदीय लाेकशाही, संविधान त्याठिकाणी जिंवत आहे की नाही अशी परिस्थिती त्याठिकाणी निर्माण झाली आहे. भारता सारख्या खंडप्राय देशात अनेक भाषा, जाती, धर्माचे लाेक असतानाही, देश एकसंध ठेवून देशाची लाेकशाही मजबूत ठेवण्याचे काम डाॅ.आंबेकर यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले.
पुढे ते म्हणाले, स्वातंत्र्यापूर्व काळात एक सरकार स्थापन करण्यात आले. त्यात बाबासाहेब यांच्याकडे जल आणि विद्युत मंडळाचे कामकाज पाहत हाेते. आज महाराष्ट्रात काही प्रश्न असून त्यातील एक सध्या वीज कमतरतेचा प्रश्न आपल्याला भेडसावत आहे. बाबासाहेब यांच्याकडे विद्युत खाते असताना त्यांनी दूरगामी निर्णय घेतले. भाक्रा-नांगल धरणाबाबत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पाण्याच्या माध्यमातून विद्युत निर्मिती बाबत त्याचा विचार त्यांनी त्यावेळी केला. एखाद्या राज्यात विद्युत निर्मिती अधिक प्रमाणात हाेत असेल आणि दुसऱ्या राज्यात कमी वीजनिर्मिती हाेत असेल तर त्याबाबतचा धाेरणात्मक निर्णय ही त्यांनी घेतला. पाॅवर ग्रीड काॅर्पारेशन द्वारे एका राज्यातील अतिरिक्त वीज दुसऱ्या राज्यात नेण्याकरिता ग्रीड टाकण्याबाबतचा निर्णय त्यांनी घेतला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App