प्रतिनिधी
मुंबई : नुसते उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन नुसत्या सभा घेऊ नका, महाराष्ट्रासाठी काम करा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले!! Don’t follow Uddhav Thackeray, work for maharashtra, Raj Thackeray tells chief minister eknath shinde
राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळाव्यातल्या भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबत सुरू असलेल्या वादावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रातली दोन वर्षातील राजकीय स्थिती पाहतोय, राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण सगळंच पाहत आलो. हे सगळं राजकारण पाहत असताना वाईट वाटत होतं. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी वेदना होत होत्या.
लहान असताना माझ्या छातीवर वाघ असायचा. लहानपणापासून राजकारण पाहत आलो, बाळासाहेबांसोबत अनुभवत आलो. अनेक्यांच्या घामातून उभी राहिलेली संघटना. माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, हे मी तेव्हा म्हणालो होतो. हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार, खड्ड्यात घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडत आहे, हे मी तेव्हा बोलत होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
आधीच्यांना पक्ष सांभाळता आला नाही, आताचे काय करतात ते बघू? असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 2006 ला मी पक्ष याच शिवतीर्थावर स्थापन केला. त्यावेळी काय झाले?, कसे झाले?, याचा चिखल मला करायचा नव्हता. काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद पाहिजे होते, हे सगळं झुट आहे. मला तसे कधी मनात आले नाही, कुणाला ते पेलणार नाही, ते झेपणार नाही. एकाला झेपले नाही, माहित नाही, दुसऱ्याला झेपणार नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App