अजितदादा म्हणाले, शेवटच्या निवडणूकीच्या भावनिक आवाहनाला फसू नका; आव्हाड म्हणाले, ते काकांच्या मरणाची वाट पाहताहेत!!

विशेष प्रतिनिधी

बारामती / मुंबई : वरिष्ठ सांगतील, ही माझी शेवटची निवडणूक आहे. पण त्यांच्या भावनिक आवाहनाला फसू नका. त्यांची कधी शेवटची निवडणूक असेल काय माहिती??, असे बोचरे वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केले. अजितदादांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांचा समाचार घेतला. अजित पवारिंनी आज हद्द ओलांडली. ते काकांच्या मृत्यूची वाट बघताहेत, शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असे शरसंधान आव्हाडांनी साधले.  Don’t be fooled by the emotional appeal of the last election

लोकसभा निवडणुकीत बारामतीत मी जो देईल, त्या उमेदवाराचे काम करा. त्याला मतदान करा. मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून मतदान वाढवा. पण तुम्हाला वरिष्ठ येऊन सांगितील, की माझी शेवटची निवडणूक आहे. ते भावनिक आवाहन करतील. पण त्यांची कुठली निवडणूक शेवटची ठरणार आहे, काय माहिती??, पण तुम्ही त्यांच्या भावनिक आवाहनाला फसू नका, असे आवाहन अजितदादांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले.

अजितदादांच्या या वक्तव्याला जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. आव्हाड म्हणाले, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे?? पण नाही, ते काकांच्या मृत्यूची वाट पाहताहेत. पण शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहील शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही.  ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही.

शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचं दिल्लीतल एक भाषण दाखवावं.  साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवारला कधी ओळखलं नाही. राज्य उत्पादन मागितलं ते दिल फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे.  अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Don’t be fooled by the emotional appeal of the last election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात