पुण्यातील हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीस साेसायटी मधील एका कुटुंबातील कुत्राने चावा घेतला. त्याचा जाब विचारण्यासाठी तिचा काका संबंधित कुत्राचे मालकाकडे गेला असता, त्यास सिमेंटचे दगड डाेक्यात मारुन, शीवीगाळ करत जीवे मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –पुण्यातील हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीस साेसायटी मधील एका कुटुंबातील कुत्राने चावा घेतला. त्याचा जाब विचारण्यासाठी तिचा काका संबंधित कुत्राचे मालकाकडे गेला असता, त्यास सिमेंटचे दगड डाेक्यात मारुन, शीवीगाळ करत जीवे मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.Dog to bite nine years girl the realative asking for answers dog owner, the relative beaten by dog owner
याप्रकरणी सिंहगड राेड पाेलीस ठाण्यात आराेपी साैरभ पाचंगे व प्रसाद तांगुदे ( दाेघे रा.पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीसांकडे चेतन रामचंद्र तिवारी (२९,रा.पुणे) यांनी तक्रार दिली आहे. तिवारी यांची नऊ वर्षीय पुतनी रिध्दी हिला साैरभ पाचंगे यांच्या मालकीच्या कुत्राने चावा घेतला.
याबाबतचा जाब चेतन याने विचारल्याचा राग मनात धरुन आराेपींनी त्यास खाली पाठुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन पार्किंगच्या आवारातील झाडाजवळ असलेले सिमेंटचे दगड घेवून चेतन तिवारी याचे डाेक्यात दगड मारुन जखमी करण्यात आले. तसेच शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी आराेपींनी दिली आहे. सिंहगड राेड पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App