वृत्तसंस्था
मुंबई : मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईला नुकताच तडाखा दिला आहे. आगामी काळात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे मुंबईत अस्मानी संकट घोंघावत असल्याचे स्पष्ट होत आहे. पाऊस मुंबईला मिठीत घेतो की काय ?, असे आता वाटू लागले आहे. Does the rain hugs Mumbai? ; Heavy rain warning
गेल्या दोन तीन दिवसातील पावसाने दिलेली सलामी म्हणा किंवा किनारपट्टीवर दिलेली धडक पाहता यंदाचा पाऊस मुंबईला मिठीत घेतो की काय ? असेच हवामान खात्याच्या अंदाजावरून वाटू लागले आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली. केवळ मुंबईचा नव्हे तर राज्यात कमी जास्त प्रमाणात पुराचे संकट येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 13 आणि 14 जून या दोन दिवसां दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे केले आहे. या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना ‘High Alert’ देण्यात आला असून सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क ठेवल्या आहेत.
उदंचन संच कार्यरत
मुंबई महानगरपालिकेने पर्जन्य जलवाहिन्या विभागाची 6 उदंचन केंद्रे व विविध ठिकाणचे पाण्याचा उपसा करणारे उदंचन संच कार्यरत असल्याची खातरजमा केली आहे. याकरिता डिझेलची व्यवस्थादेखील स्थानिक उदंचन संच चालकांनी केली आहे.
अग्निशमन दलाची तैनाती
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात केली आहेत.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर ठेवण्यात आले आहे.
तटरक्षक दल, नौसेना अलर्टवर
भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांनाही कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते मदतीसाठी सज्ज आहेत. बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन ‘High Alert’ वर ठेवण्याचे आले असून त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.
मनुष्यबळ उपलब्ध करून दिले
मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
मिठी नदीच्या पातळीत वाढ
मिठी नदीच्या पातळीत वाढ होताच क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना दिली आहे. त्वरीत मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडीही तैनात केली आहे. मुंबई महापालिकेच्या 24 विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित केलेल्या महापालिका शाळा त्वरित मदतीकरिता सुसज्ज केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App