विशेष प्रतिनिधी
मुंबई : मध्य प्रदेशातील युजर्सना जिओ फायबरच्या सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर मुंबईत जिओ यूजर्सनी ट्विटरवर आपल्या तक्रारी केल्या आहेत. कोणत्याही नंबरवर कॉल आल्यावर कॉल रिसिव्ह होत नसल्याचा युजर्सचा दावा आहे. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की जिओ वरून जिओ नंबरवर आणि जिओ वरून इतर नंबरवर कॉल करण्यात समस्या येत आहे. Disruption in Reliance Jio service in Mumbai
रिलायन्स जिओ ग्राहकांच्या असंख्य तक्रारीनंतर कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, ५ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ नंतर सेवा सुरू होतील. हे आश्वासन कंपनीने युजर्सना मेसेजद्वारे दिले आहे. Jio ने या आउटेजबद्दल सार्वजनिकरित्या काहीही सांगितले नाही. मुंबईतील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना इंटरनेट वापरादरम्यान नेटवर्कवर नोंदणीकृत नसल्याचा संदेश मिळत आहे.
आर्थिक राजधानी मुंबईत रिलायन्स जिओची सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबईत अनेक भागातील वापरकर्ते कॉल करू शकत नाहीत किंवा इंटरनेट वापरू शकत नाहीत. गेल्या चार महिन्यांत जिओ सेवा मुंबईत ठप्प होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याआधी जून 2020 मध्ये मोठा आउटेज होता. 22 जून 2020 रोजी, लखनौ, लुधियाना, डेहराडून आणि उज्जैन दिल्ली-एनसीआरमध्ये जिओ फायबर सेवा जवळपास 24 तासांसाठी बंद करण्यात आली होती.
अनेक वापरकर्त्यांनी जिओ फायबरमधील समस्यांबाबतही तक्रार केली आहे. रिपोर्टनुसार, जिओने मुंबई सर्कलमधील आपले नेटवर्क बंद केले आहे. Downdetector ने देखील पुष्टी केली आहे की मुंबई सर्कलमध्ये Jio सेवा बंद आहे. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही जिओचे नेटवर्क डाउन झाले होते, त्यानंतर ग्राहक 8 तास नाराज झाले होते. त्या काळातही यूजर्सना इंटरनेट आणि कॉलिंग या दोन्ही सेवांमध्ये अडचणी येत होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App