आदीपुरुष सिनेमा रिलीज होण्याआधीचं वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करणार..

प्रदर्शनापूर्वीच तिकीट विक्रीला तुफान प्रतिसाद साधारण पाच कोटींच्या तिकीट विक्रीचा अंदाज..


विशेष प्रतिनिधी

पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला आदी पुरुष हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने रिलीज होण्याअगोदरच विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. Director Om raut upcoming movie adipurush..

हा सिनेमा 400 कोटी रुपयांचं बजेट घेऊन तयार झाला आहे.

या सिनेमातील स्टार कास्टवर अनेकांनी टीका केलीये.. या सिनेमात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान हा चित्रपटाच्या प्रमोशन पासून का दूर आहे? असा सवालही विचारला जातोय .

या आधी सैफ अली खानचा या चित्रपटातील लूक रिलीज करण्यात आला त्यावेळी नंतकऱ्यांनी सैफ अली खानच्या लुक बद्दल बरीच टीका केली होती.

सध्या मात्र आदीपुरुष हा सिनेमा वेगळ्या कारणाने चर्चेत आहे .. हा सिनेमा पहिल्याच दिवशी शंभर कोटीची कमाई करणार का असा सवाल उपस्थित केला जातो. त्याला कारणही तस आहे.

या आधी अभिनेता रणबीर कपूरनं या सिनेमाचे गरीब मुलांसाठी दहा हजार तिकीट बुक केली. तर काश्मीर फाईल या सिनेमाचे निर्माते यांनी देखील दहा हजार तिकीट बुक केली आहेत.

11 जून पासून आदी पुरुष या सिनेमाचं ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाला असून, त्या बुकिंग ला चांगला प्रतिसाद मिळतोय . पहिल्याच आठवड्यात या सिनेमाची दीड लाख तिकीट विकल्या गेल्याचं सांगितल्या जात आहे. त्याची किंमत साधारणतः पाच कोटीरुपये सांगितल्या जात आहे .
निर्मात्याच्या माध्यमातून हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहंचंला आहे..

सुरुवातीला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी हा सिनेमा रिलीज होऊदेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र दिग्दर्शकाने या चित्रपटात काही बदल केल्यानंतर आणि या सिनेमाच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत,असं स्पष्ट केल्यानंतर या सिनेमाचा रिलीजचा मार्ग मोकळा झाला.

आधी पुरुष हा सिनेमा 16 जूनला रिलीज होतोय.. हा सिनेमा जवळपास पाच भाषांमध्ये रिलीज केल्या जातोय. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणार असा विश्वास व्यक्त केला जातोय.

Director Om raut upcoming movie adipurush..

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात