धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३३ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या लाखो शंभुभक्तानी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोटगर्दी केली होती.
विशेष प्रतिनिधी
पुणे – धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३३ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी राज्यभरातून आलेल्या लाखो शंभुभक्तानी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोटगर्दी केली होती. यावेळी हेलीकॅप्टरमधून पुष्पवृष्ठी व शासकीय मानवंदनाही देण्यात आल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्व प्राप्त झाले .Dharmavir chatrapati sambhaji maharaj ३३३remembrance at vadhu budruk
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३३ व्या बलीदान स्मरण दिनानिमित्त श्री क्षेत्र वढु बुद्रूक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे बारा वाजता मंत्रोपचारात हेलीकॅप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे , आमदार अॅड अशोक पवार , अभिनेते प्रविण तरडे , जिल्हा नियोजनचे पंडित दरेकर , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच लाखोंच्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते. त्यानंतर समाधी स्थळावर पोलीसांनी शासकीय मानवंदना दिल्याने बलीदानस्मरण दिनास वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
यावेळी पै. संदिप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र किल्ले पुरंदर ते श्री क्षेत्र वढु बुद्रुक – तुळापर , धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण गोदाकाठ येथुन पालखी , श्री शिरुर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढु बुद्रुक पालखी , पुण्यातुन हेडगेवार ज्योत , आईसाहेब अध्यात्मिक ज्ञान विज्ञान संस्था वाडे बोल्हाई यांची किल्ले शिवनेरी ते वढु पालखी व राज्य भरातुन असंख्य शंभुभक्त ज्योत घेवुन समाधीस्थळावर आगमन झाल्याने सर्वत्र ज्ञानोबा तुकाराम व छत्रपती संभाजीराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की ,‘पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेला २५० कोटींचा निधी आमदार पवारांनी आता ३०० कोटीवर नेला असुन या शक्तिस्थळाला अलौकीक महत्व असुन येथिल स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
आमदार अशोक पवार यांनी सांगितले की वढू-तुळापुरच्या विकासासाठी २५० कोटी निधी मंजुर असताना याठिकाणचा विकास जागतीक दर्जाचा करुन शंभूराजांना अभिवादन ठरणार असताना जगाला आदर्शवत असे स्मारक प्रेरणादायी ठरणार असल्याचे शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
चौकट : पुढच्यावर्षी बलीदानदिनी शंभूराजांच्या चित्रपटाच्या प्रसिध्दीची तारीख जाहिर करणार शंभूराजांचा ज्वाज्वल्य इतिहास छोट्या पडद्यावर १५७ देशात पोहोचविताना , प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते व शिवप्रताप वाघनख हे चित्रपट येत असताना पुढील वर्षीच्या बलीदान दिनी शंभूराजांच्या जीवनावरील चित्रपटाची तारीख समाधीस्थळावरच जाहिर करणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
चौकट : शिवनेरीप्रमाणे शंभूराजांच्या समाधीस्थळावर मुख्यमंत्री येण्यासाठी प्रयत्न करणार शिवरायांच्या जयंतीला किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासकीय मानवंदनेसाठी येत असतात तर शंभूराजांच्या समाधीस्थळावर बलीदान दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री का येत नाहीत हा प्रश्न उपस्थित केल्यावर आमदार अशोक पवार यांनी बलीदान दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App