विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवार – काका पुतण्यांच्या राजकारणाची मर्यादा एवढी आहे की, त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी नवे उमेदवारच सापडेनासे झाले आहेत. त्यामुळे ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात हे करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. dharashiv loksabha candidate archana patil ncp
अजितदादांनी महायुतीला धाराशिव लोकसभा मतदारसंघ अधिकारवाणीने आपल्याकडे मागून घेतला. तिथे उमेदवार देताना मात्र त्यांना ताटातले वाटीतच करावे लागले. अजितदादांनी धाराशिव मधून अर्चना पाटलांना ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उतरवले. धाराशिवची लढत ही घरातलेच भांडण आहे.
अर्चना पाटील या भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह यांच्या पत्नी असून त्या शरद पवारांचे एकेकाचे निकटवर्ती आणि राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई आहेत. इतकेच नाही तर त्या नात्यातून सुनेत्रा पवारांच्या सुनबाईच लागतात. कारण पद्मसिंहांचे घराणे हे सुनेत्रा पवारांचे माहेर आहे.
राणा जगजीत सिंह सध्या भाजपचे आमदार आहेत अजितदादांनी सुरुवातीला त्यांनाच लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली होती, पण त्यासाठी त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीत येण्याची अट घातली होती त्यांनी राणा जगजीत सिंह यांनी ती अट फेटाळली. त्यांच्या ऐवजी अर्चना पाटलांना म्हणजे आपल्या पत्नीला त्यांनी राष्ट्रवादीत पाठवले. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटलांची धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
तिकडे शरद पवार देखील मोहिते पाटलांचे घराणे भाजपमधून पुन्हा आपल्या राष्ट्रवादीत कधी येतील याची वाट पाहत आहेत. एकदा धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत आले आणि त्यांनी तुतारी हातात घेतली की शरद पवार त्यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार आहेत. शरद पवारांचे सुद्धा ताटातले वाटीतच होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App