Devendra Fadnavis : मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारतात देवेंद्र फडणवीसांची कॅन्सर पेशंटसाठी 500000 रुपयांच्या मदतीवर पहिली सही!!

Devendra Fadnavis

वृत्तसंस्था

मुंबई : Devendra Fadnavis  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जाऊन ताबडतोब कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली पहिली सही एका कॅन्सर पेशंटसाठी पाच लाख रुपयांच्या मदतीवर केली.Devendra Fadnavis



पुण्यातील कॅन्सर पेशंट चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो शस्त्रक्रियेची डॉक्टरांनी शिफारस केली आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची मदत शासनाने त्यांना मुख्यमंत्री आरोग्य निधीतून केली. त्यांच्या फॉर्मवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली सही केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री यांच्या दालनात उपस्थित होते. फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली, तर पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले, त्याचबरोबर बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

Devendra Fadnavis takes charge of the Chief Minister’s office and signs the first Rs 500000 aid for cancer patients!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात