विशेष प्रतिनिधी
शिर्डी : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय. त्याविरोधात आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुढचे युद्ध तीव्र करावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डीत भाजप महाअधिवेशनात दिला. व्होट जिहादची मोडस ऑपरेंडी त्यांनी एक्स्पोज केली. Devendra Fadnavis
– देवेंद्र फडणवीस म्हणाले :
– लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह चालवले. अराजकतावादी शक्तींमार्फत समाजात भेद निर्माण केला. व्होट जिहादचा प्रयोग करून महाविकास आघाडी जिंकली.
– पण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शक्तींच्या एकजूटीने व्होट जिहाद, अराजकतावादी शक्ती पराभूत झाल्या. महाविकास आघाडीला दारूण पराभव पत्करावा लागला.
– पण आता व्होट जिहाद पार्ट 2 सुरू झालाय. बांगलादेशी घुसखोर मतदार याद्यांमध्ये नावे घुसवून आपली पॉकेट्स तयार करत आहेत. मालेगाव, अमरावतीतल्या अंजणगाव मध्ये त्यांना जन्माचे दाखले देणारी रॅकेट्स आढळली आहेत. त्यांच्या वर कठोर कारवाई केली आहे.
– व्होट जिहाद पार्ट 2 आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या विरोधात लढाई तीव्र करावी लागणार आहे. देशात आणि महाराष्ट्रात एकही घुसखोर टिकू देता कामा नये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App