मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाउन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!

नाशिक : मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाऊन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!, असे महाराष्ट्राच्या राजकारणातले चित्र निर्माण झालेय. पहिलीपासून हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याला स्ट्राईक देऊन टाकला. याची प्रत्यक्ष कबुली राज ठाकरे यांनी जाहीरपणे दिली. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा जे जमले नाही, ते फडणवीसांनी हिंदीची सक्ती हा मुद्दा पुढे करून जमवून आणले. ठाकरे बंधू एक झाले, असे राज ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते.

– पुण्यातली दादागिरी मोडू : फडणवीस

त्यापाठोपाठ फडणवीस यांनी पुण्यामध्ये दादागिरीचा बाउन्सर टाकला. या एका बाऊन्सरमध्ये अजितदादा + चंद्रकांतदादा आणि पुण्यातल्या औद्योगिक क्षेत्रातली दादागिरी त्यांनी गुंडाळून टाकली. पुण्यातल्या इतर कुठल्याही मुद्द्यापेक्षा दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आणला. फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवारांच्या घरातल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांना दादागिरी नेमकी कुणाची??, हा सवाल विचारावा लागला. पुण्यातल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे दादा फिरतायत. ते वेगवेगळ्या पक्षांची नावे घेऊन दादागिरी करतायेत. ती दादागिरी मी मोडूनच काढणार आहे. यामध्ये जे साथ देतील त्यांचे स्वागतच आहे, असे वक्तव्य फडणवीस यांनी आज पुन्हा नागपुरात केले. एका वक्तव्यातून फडणवीस यांनी पुण्यात दादागिरीचा मुद्दा केंद्रस्थानी आणला.

फडणवीसांच्या या खेळीमुळे मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे बंधू आणि पुण्यामध्ये भाजप विरुद्ध अजितदादा ही लढाई पक्की ठरली. त्यामुळे आता महायुती झाली तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दुय्यम स्थानावर ढकलण्याची संधी पण प्राप्त झाली आणि महायुती झाली नाही, तर बाकी कुठल्याही विरोधकांना न जुमानता भाजप विरुद्ध ठाकरे बंधू आणि भाजप विरुद्ध अजितदादा हे घमासान लढण्याची ही संधी साधून घेतली. शिंदे शिवसेनेला स्वतंत्र लढायची स्थिती ठेवली नाही.



– काँग्रेस + पवार तिसऱ्या – चौथ्या स्थानावर

फडणवीसांच्या या खेळीमुळे मुंबई शहरातली काँग्रेस आणि पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आपोआपच तिसऱ्या चौथ्या स्थानावर ढकलल्या गेल्या. भाजप सारख्या बलाढ्य शक्तीशी स्पर्धा करून जिंकण्याची त्यांची स्थितीच शिल्लक ठेवली नाही. Political narrative war मध्ये भाजप आणि ठाकरे बंधू यांनी एवढी भांडी वाजवून ठेवली की मुंबईमध्ये काँग्रेसला भांडीच वाजवायला शिल्लक राहिले नाहीत. त्याच पद्धतीने पुण्यात दादागिरीचा विषय उकरून काढून फडणवीसांनी अजितदादांना एक तर बरोबर यायची किंवा स्वतंत्र लढायची म्हणजे स्वतंत्रपणे भांडी वाजवायची संधी निर्माण करून दिली. यातून त्यांनी शरद पवारांचा पक्ष तिसऱ्या – चौथ्या स्थानावर ढकलून दिला.

– पवारांना करावी लागतीय फेरमांडणी

म्हणूनच पवारांना महाराष्ट्राच्या फेरमांडणीत संभाजी ब्रिगेडला आश्रयाला घ्यावे लागले. शेतकरी कामगार पक्षाला ठाकरे बंधूंच्या आश्रयाला जावे लागले.

Devendra fadnavis set proper game clean bold Congress and NCP SP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात