विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि भाजप यांची परस्पर घडवली युती, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली माध्यमांचीच पिसे!!, असे आज घडले.
त्याचे झाले असे :
भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि चंद्रकांतदादा पाटील यांची त्या समारंभात भेट झाली. दोघांचे नमस्कार – चमत्कार झाले. त्यामुळे माध्यमांनी ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार आणि त्यांची पुन्हा युती होणार अशा बातम्या चालवल्या. तशा अटकळी बांधल्या. त्यामध्ये त्या बातम्यांना संजय राऊत यांनी “फोडणी” दिली. दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या मनात तसे असू शकते. त्यामुळे भविष्यात काय घडेल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे संजय राऊत बोलून गेले. पण त्याचवेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर युती मोडल्याचा ठपका ठेवून दिला. भाजप आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडेल, असा दावा केला.
Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
या सगळ्या संदर्भामध्ये पत्रकारांनी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी लग्नात कुणाच्या भेटीगाठी झाल्या, तर दोन पक्षांची युती होते असा भाबडा विचार तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी तरी मनात आणू नये, अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला प्रश्नकर्त्यांना हाणला. त्या लग्नाला मी गेलो असतो, तर माझी देखील उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली असती. त्यात वेगळे आणि विशेष काही घडले नसते, असे फडणवीसांनी सांगितले. ठाकरे + भाजप युतीचा विषय त्यांनी एका झटक्यात संपवून टाकला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App