प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवत शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकार स्थापनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याची वाखाणणी केली आहे. Devendra Fadnavis played a major role in forming the government after the uprising in Maharashtra
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष आमदारांसह केलेल्या उठावानंतर महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार कोसळून नवे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्याला आज 30 जून 2023 रोजी एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सरकारच्या कामाचा आढावा घेतला. त्याचवेळी त्यांनी सरकार स्थापनेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व कौशल्याचा सिंहाचा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ३० जूनला माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्याच्या आधीचा इतिहास मी सांगू इच्छित नाही. शिवसेना – भाजप युतीचे सरकार स्थापन व्हावे, असा कौल जनतेने दिला होता. तशी अनेकांची इच्छा होती. ती इच्छा आम्ही पूर्ण केली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मनापासून धन्यवाद देईन आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सिंहचा वाटा होता. मी त्यांना देखील मनापासून धन्यवाद देईन.
पवारांनी फडणवीसांना नव्हे, अजितदादांनाच क्लीन बोल्ड केले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही दोघेच होतो. त्यासाठी आम्ही जनहिताचे निर्णय घेतले. आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या ४० बैठका झाल्या पण यामध्ये आमच्या वैयक्तिक लाभाचा निर्णय तुम्हाला सापडणार नाही. त्यामुळे या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. काही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झाल्या होत्या. त्या महाविकस आघाडी सरकारच्या काळात बंद केल्या, पण आमचे सरकार आले आणि आम्ही त्या पुन्हा सुरू केल्या. मी मोदींना धन्यवाद देईन, सर्व केंद्रीय मंत्र्यांना धन्यवाद देईन. त्यांनी आमचे कोणतेही प्रस्ताव मागे ठेवले नाहीत. देशात पहिल्या नंबरवर राज्याचे प्रकल्प आहेत, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
– त्यांना स्वप्नात राहू द्या!!
शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. शिंदे – फडणवीस सरकार येत्या काही महिन्यांमध्येच कोसळणार असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यांना असं वाटतं त्यांना त्यांच्या स्वप्नात राहू द्या. मी त्यांना शुभेच्छा देतो!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App