विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण करून तो प्रकल्प यशस्वी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते रत्नागिरी म्हणजेच विदर्भ ते कोकण हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेतला. परंतु दरम्यानच्या काळात विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करू, असे सांगितल्याचे भांडवल करून कोल्हापूर जिल्ह्यातील विरोधक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर “पॉलिटिकल बार्गेनिंग करायचा मूडमध्ये आले. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विधान परिषदेत त्या संदर्भात मुद्दा उकरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा दावा केला. त्यांना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची साथ मिळाली. मात्र, जयंत पाटलांनी आझाद मैदानावर बसलेल्या शेतकऱ्यांपुढे बोलताना माझ्यावर विश्वास ठेवू नका असे वक्तव्य करून संशयाची पेरणी केली. पण त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतच विरोधकांचा दावा पूर्णपणे खोडून काढला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
शासनाची भूमिका स्पष्ट आहे, शक्तिपीठ महामार्ग हा रस्ता करायचा आहे, पण तो कुणावरही लादायचा नाही. बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत कोल्हापूर एअरपोर्टला शेतकरी प्रतीक्षा करत होते, तेव्हा शेतकरी या मार्गाला विरोध करत नसून सह्याचं निवेदन त्यांनी दिले. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्याचं चित्र बदलणारा आहे. शेतकऱ्यांना हा मार्ग हवा आहे, हा अट्टाहास नाही. समृद्धी महामार्गाने 12 जिल्ह्यातील जीवन बदललं, तसं या महार्गाने देखील जीवन बदलणार आहे. आज मुंबईत जसा मोर्चा आला, त्याच्या तिप्पट कार्यक्रम हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी होणार आहे. ज्या गावांमध्य सभा झाल्या, त्या गावात शेतकऱ्यांनी पैसे दिले आहेत. शेतकऱ्यांना जमिनीच्या पाचपट भाव दिला आहे. त्यामध्ये विरोधकांनी देखील मदत करावी.
शक्तिपीठ हा महामार्ग नागपूर ते रत्नागिरीला जोडू शकतो, पण तो रस्ता आधीच आहे. सोलापूरवाल्यांनी, सांगोल्याच्या लोकांनी रस्ता दिला आहे. थोडा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, आज महाराष्ट्रामधील शेतकरी तिथे जमले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांना भेटीसाठी बोलावलं पाहिजे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच, ज्यांनी परवानगी दिली असं तुम्ही बोलत आहात, पण तेचं पहिले विरोध करायचे. त्यामुळे, याचा फेरविचार करावा, अशी मागणीही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सभागृहातच करुन दिली.
याच मुद्द्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यातून छेद दिला. जेवढे शेतकरी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जेवढे शेतकरी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत त्याच्या तिप्पट शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App