Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदा सकट कुठल्याच रेसमध्ये नाहीत, पण…!!

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासकट कुठल्याच रेसमध्ये नाहीत. कारण तशी कुठली रेसच अस्तित्वात नाही, असा स्पष्ट खुलासा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला, पण देवेंद्र फडणवीस असा नट बोल्ट आहेत, जो पार्टीने कुठेही फिट केला, तर तो सगळीकडे फिट बसेल, असेही ते म्हणाले. Devendra Fadnavis is not in any race for Chief Ministership

महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर नवा चेहरा मुख्यमंत्रीपदी येणार, देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात निघून जाणार किंवा ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, वगैरे अटकळी आणि बातम्या माध्यमांमधून सध्या चर्चेत आहेत. या संदर्भात एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा केला. मी स्वतः मुख्यमंत्री पदाच्या रेस मध्ये नाही. Devendra Fadnavis

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये देखील नाही. कारण तशा कुठल्या रेसेस अस्तित्वात नाहीत. निवडणुकीनंतर महायुतीतल्या घटक पक्षांचे सगळे नेते एकत्र बसतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवतील. भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना या संदर्भात अधिकार प्रदान करते. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील. मी प्रादेशिक पातळीवरचा नेता असल्यामुळे माझ्याकडे तसा कुठलाही अधिकार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात नवाच चेहरा मुख्यमंत्री होऊ शकेल, असा फॉर्म्युला राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश या राज्यांचा अहवाला देऊन मांडला होता. त्यावर विनोद तावडे हे राष्ट्रीय पातळीवर काम करतात त्यांना दिल्लीतल्या बऱ्याच गोष्टी आणि घडामोडी माहिती असतात त्यामुळे ते तसे बोलले असतील तर कदाचित नवा चेहरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर बसलेला दिसेल, अशी पुस्ती देखील फडणवीस यांनी जोडली. देवेंद्र फडणवीस यांच्या या मुलाखतीमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या बातम्यांना वेगळे वळण मिळाले आहे.

Devendra Fadnavis is not in any race for Chief Ministership

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात