शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची जपानमधून शिष्टाई; केंद्र सरकार 2 लाख मे.टन कांदा 2410 ₹ दराने खरेदी करणार!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संपूर्ण देशभरात टोमॅटोचे भाव भडकल्यानंतर महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवरील शुल्क 40 % केले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कांदा उत्पादक अस्वस्थ झाले. त्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जपानमधून राजकीय शिष्टाई करत महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारला घ्यायला लावला आहे. devendra fadnavis from japan about onion rate

केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण जाणून तब्बल 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून तो प्रतिक्विंटल ₹2410 ने खरेदी करेल. यासाठी नाशिक आणि नगर या दोन ठिकाणी लवकरच कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून तेथून हा कांदा केंद्र सरकार खरेदी करेल. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

या संदर्भातली माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली. देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि व्यापारमंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना कांदा उत्पादकांची अडचण कानावर घातली. त्यानंतर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदीचा निर्णय घेतला.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट असे :

महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.

devendra fadnavis from japan about onion rate

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात