विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यांच्या कार्यकाळामध्ये पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरवली जात होती. असे मला काही लोक सांगतात. मात्र, आता असे काही होत नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. Devendra Fadnavis’ counterattack on Sharad Pawar
आचारसंहिता लागल्यानंतर देखील सत्ताधारी पक्षाच्या वतीने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरवली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. शरद पवार यांच्या आरोपाला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या म्हणजेच शरद पवार यांच्या कार्यकाळामध्ये तसे प्रकार घडत होते. असे मला काही लोक सांगतात. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. मात्र, आता तसे काहीही होत नसल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
गोपाळ शेट्टी माघार घेण्याची अपेक्षा
गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कायमच पक्षाचा विचार केला आहे. त्यामुळे पक्षाची जी लाईन आहे, पक्षाचे जे ध्येयधोरण आहे. त्यानुसार गोपाळ शेट्टी माघार घेतील, अशी मला अपेक्षा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गोपाल शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर त्यांची पक्षातील अनेक नेत्यांनी भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे आज गोपाळ शेट्टी हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर या बंगल्यावर पोहोचले होते. मात्र गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस पुणे येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना गोपाळ शेट्टी हे उमेदवारी मागे घेतील अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App