अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईमुळे सरकारने क्रौर्याच्या सर्व मयार्दा ओलांडल्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुन्हेगारांनाही वागणूक दिली जात नाही, तशी वागणूक सरकारने राणा दांपत्याला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला. Devendra Fadnavis alleges that the government exceeded all limits of cruelty in taking action against the Rana couple
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कारवाईमुळे सरकारने क्रौर्याच्या सर्व मयार्दा ओलांडल्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुन्हेगारांनाही वागणूक दिली जात नाही, तशी वागणूक सरकारने राणा दांपत्याला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणार असल्याची घोषणा राणा दांम्पत्यांनी केली होती. त्यानंतर राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळाले .या सर्व घडामोडींनंतर राणा दांपत्याला बारा दिवस तुरुंगात राहावे लागले. यामध्ये नवनीत राणा यांची प्रकृती खालावली होती. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.नागपूर येथे आज सकाळी माध्यमांशी संवाद…https://t.co/0jT6E28pWA#Nagpur pic.twitter.com/2OWjvJToYR — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 8, 2022
महाविकास आघाडी सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.नागपूर येथे आज सकाळी माध्यमांशी संवाद…https://t.co/0jT6E28pWA#Nagpur pic.twitter.com/2OWjvJToYR
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 8, 2022
राज्यात हनुमान चालीसा म्हणण्यावरुन राजकारण चांगलेच तापले असताना राणा दांपत्याने मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांना चकमा देत राणा दांपत्य मुंबईतही पोहोचले. मात्र, त्याचवेळी शिवसैनिकांची गर्दी मातोश्रीबाहेर झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत राणा दांपत्याला ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्यांना बारा दिवस तुरुंगात राहावे लागले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App