विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला भाजपने उघडे पाडले. हे सरकार अपयशी असल्याचे सिध्द केले आणि म्हणूनच सरकारने खोटे आरोप लावून १२ आमदारांचे निलंबन केले, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला.devendra fadanavis targets thackeray – pawar govtover 12 MLAs suspension
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही ठाकरे – पवार सरकारला उघडे पाडले. आम्ही हे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवून दिले. म्हणूनच सरकारने खोटे आरोप लावून १२ आमदारांना निलंबित केले आहे.
पण जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा लावून धरणार. आत्तापर्यंत नेहमीच असे प्रकार घडले परंतु कुणी कधी निलंबित झाले नाही. एकाही भाजपाच्या सदस्याने शिवी दिलेली नाही. शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी बघितले आहे. शिवसेनेचे सदस्य होते त्यांनी धक्काबुक्की केली.
आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांच्याशी सर्वांच्यावतीने क्षमा मागितली आणि तो विषय संपवून आम्ही बाहेर आलो. पण आमच्या आमदारांच्या निलंबनासाठी खोटी स्टोरी रचण्यात आली, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सत्ताधारी आणि विरोधक समोरा-समोर आले, एवढेच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यावरून आज भाजपाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले.
त्यानंतर भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. या विषयावर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App