देवेंद्रजींनी संयम बाळगला, ते उद्धट किंवा उध्वस्त ठाकरे नाही म्हणाले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना जरी फडतूस गृहमंत्री म्हटले असले, तरी त्यांचे काम आणि कर्तृत्व जास्त मोठे आहे. देवेंद्रजींनी देखील ठाकरेंना प्रत्युत्तर देताना संयम बाळगला. ते उद्धट किंवा उध्वस्त ठाकरे असे नाही म्हणाले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. Devendra Fadanavis kept patience while giving befitting reply to Uddhav Thackeray, pinched eknath shinde

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात “मी सावरकर” या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि भाजपचे आमदार आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एका मागून एक टोले हाणले.



महाराष्ट्रात आमचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था कठोर पद्धतीने राखते आहे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगना राणावतचे घर पाडले, केतकी चितळेला अटक केली, अर्णव गोस्वामीला तुरुंगात घातले, एबीपी माझाचा पत्रकार राहुल कुलकर्णीलाही तुरुंगात घातले. पण राष्ट्रवादीचे दोन मंत्री जेलमध्ये गेले तरी त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत उद्धव ठाकरेंना झाली नाही, ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीला फडतूस म्हणतात, हे त्यांना शोभत नाही, असे शरसंधान एकनाथ शिंदे यांनी साधले.

त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची स्तुती करताना उद्धव ठाकरे जरी त्यांना फडतूस म्हणाले असले, तरी देवेंद्रजींनी संयम बाळगला. ते त्यांना उद्धट किंवा उध्वस्त ठाकरे म्हणाले नाहीत ,असा टोला एकनाथ शिंदे यांनी हाणला. महाराष्ट्र प्रत्यक्ष कामाला महत्त्व देतो. आरोप – प्रत्यारोप यांना महत्त्व देत नाही. पण आम्ही देखील त्यांना योग्य वेळी त्यांच्या भाषेपेक्षा कडक भाषेत प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

Devendra Fadanavis kept patience while giving befitting reply to Uddhav Thackeray, pinched eknath shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात