मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असताना आमदार खासदार आपल्या पदाचे राजीनामा देत असतानाच आता तीन आमदारांनी मंत्रालय शेजारील गांधी पुतळ्यासमोर उपोषण आंदोलन सुरू केले. राजकीय नेत्यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने त्यांनाही उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. Despite the honest efforts of the government for Maratha reservation, why the hunger strike of the ruling MLAs

मात्र मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः प्रामाणिक प्रयत्न करत असताना सत्ताधारी पक्षांचे आमदार आपल्या सरकार विरुद्ध कस काय उपोषण करू शकतात यातून समाजाला ते कोणता संदेश देतात अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.

अजित पवार आजारी आहेत. त्यांना 101 ताप आहे. त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांच्या रक्तातल्या प्लेटलेट्सही कमी झाल्या आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांच्यावर त्यांच्या घरातच म्हणजे देवगिरी बंगल्यातच उपचार सुरू आहेत. पण तरी देखील अजित पवारांनी मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. त्यांना संबोधित केले.

मराठवाड्यात मराठा आंदोलकांनी जो हिंसक पावित्रा घेतला आहे त्याच्यासह सर्व घडामोडींची इत्यंभूत माहिती अजितदादा घरूनच घेत आहेत. त्यातच याच हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याने मुंबईतल्या पोलिस यंत्रणेही अलर्ट मोडवर जात मंत्रालयच्या अवती भोवती एक मोठे कडे केले होते.

अशावेळी मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक सरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार राजू नवघरेंनी मंत्रालयाच्या शेजारील गांधी पुतळ्यासमोर ठिय्या देत उपोषणाला सुरुवात केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांकडून लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ७ वा दिवस आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. याआधी मराठा आरक्षण प्रश्नावर आता पर्यंत दोन खासदार आणि दोन आमदारांनी आता पर्यंत राजीनामे देऊ केले आहेत.

उपोषणाची गंभीर दखल

मराठा आंदोलनाचा फटका काही प्रमाणात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना होत असताना व अजित पवार गट सत्तेत सहभागी असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनीच ते ही दादा गटाच्या याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या देवगिरी या शासकिय निवासस्थानी आपल्या गटाच्या सर्व आमदार व मंत्र्यांची संध्याकाळी तातडीची बैठक बोलावून सर्वांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

राज्यात आपण सरकार मध्ये सहभागी असताना आपल्याच सरकार विरोधात आपणच उपोषण कसे काय करु शकतो?? मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः प्रामाणिकपणे काम करत असताना तुम्ही आंदोलकांना सरकारची भूमिका समजावून सांगण्यापेक्षा तुम्हीच उपोषणाला बसून काय संदेश पाठवू पाहत आहात??, अशा खरमरीत शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहिती त्यांच्याच गटाच्या विश्वसनीय अंतर्गत सूत्रांनी दिली.

Despite the honest efforts of the government for Maratha reservation, why the hunger strike of the ruling MLAs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात